राजकीय

मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्यांबाबत खासदार सुनील तटकरे यांची पेण येथे आढावा बैठक.

(अरविंद गुरव)

पेण दि. १९:- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा पेण तालुक्यातील खारपाडा ते आमटे येथून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचा पहाणी दौरा आज शुक्रवार दि. १९/७/२०२४ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार होता पण सतत पडणाऱ्या पावसामुळे दौरा रद्द करण्यात आल्याने प्रांत कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, प्रांत अधिकारी प्रविण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे यशवंत घोटकर आदींसह अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आज पेण प्रांत कार्यालयात झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार सुनील तटकरे यांनी स्थानिकांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या जाणून घेतल्या यामध्ये खारपाडा, जिते, बळवली, तरणखोप, पेण शहर, रामवाडी, वाशी नाका, कांदळेपाडा, वडखळ, डोलवी, गडब, खारपाले, आमटेम गावांच्या कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या निष्कृष्ट कामामुळे मोठ्याप्रमाणात समस्या निर्माण झाल्याने गावकारी पूर्ते हैराण झालेले आहेत.

 यावेळी झालेल्या आढावा बैठकीत तरणखोप येथील समस्या मांडतांना दिनेश पाटील हे खूप आक्रमक होउन पोटतिडकीने आपल्या गावाची समस्या मांडून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात किती फेऱ्या मारल्या याचा पाढा वाचला तर पेण शहरातून राष्ट्रीय महामार्गवर जात असताना एसटी महामंडळाच्या बसेस व कंपनीच्या बसेसना पुढे मागे करावे लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा प्रश्न पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी उपस्थित केले तर रामवाडी येथील सर्व्हिस रोड संदर्भात मा. नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी आपली समस्या मांडतांना कश्याप्रकारे रामवाडी येथे अपघात होउ शकतो यासदंर्भात माहिती दिली तर कांदळेपाडा येथील सांडपाण्याच्या संदर्भात गेली तीन ते चार वर्ष तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, कलेक्टर कार्यालय येथे पाठपुरावा करुन देखील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने गावामध्ये पाणी शिरुन मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्याचे आपली व्यथा सरपंच मुरलीधर भोईर यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या समोर मांडली. तर वडखळचे मा. सरपंच योगेश पाटील यांनी जुन्या वडखळ रस्त्याबाबत अधिकरी कश्याप्रकारे टोळवाटोळवीची उत्तर देतात याबाबत आपली कैफीयत मांडली तर डोलवी गावचे सरपंच परशुराम म्हात्रे यांनी डोलवी बायपास रस्त्याच्या अंडरपास मध्ये पाणी साचण्याबाबत खासदारांचे लक्ष केंद्रीत केले.

 या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अधिकारी वर्गांना जाब विचारला परंतू, दर वेळेच्या बैठकीप्रमाणे अधिकारी निरउत्तरीत होते. तसेच शुक्रवार पासून मंगळवारपर्यंत खारपाडयाच्या पुलापासून आमटेम पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर जाउन समस्यांचे निराकरण करणे तसेच या कामावर प्रांत अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवणे असे ही आदेश दिले तसेच पुढे त्यांनी काही त्रुटी आल्यास अधिवेशनाच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन सोडविण्यात येतील असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!