निवडणुक प्रक्रियेमध्ये डावलल्यामुळे शिशिर धारकर यांचा राजीनामा !

प्रतिनिधि, पेण
२१ ऑगस्ट २०२३ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केलेले आणि पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँकेचे तात्कालीन अध्यक्ष शिशिर धारकर यांनी आज आपल्या आपल्या पेण विधानसभा समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा देतांना शिशिर धारकर यांनी माजी खासदार आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिशिर धारकर यांनी अवघ्या एक वर्ष आणि तिन महिन्यात शिबसेना (ऊबाठा) पेण विधानसाभा समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. शिशिर धारकर यांच्या राजिनाम्यामुळे शिवसेनेला धक्का बसला असला आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार याबाबत शिशिर धारकर यांना जाणीवपूर्वक डावले जात होते. याबाबत शिशिर धारकर यांनी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार त्यांना याबाबत कळवले होते. मात्र माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते माझ्या सांगण्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे शिशिर धारकर यांनी सांगितले.
पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आरोपी असल्यामुळे धारकर यांना विधानसभा २०२४ च्या निवडणूक प्रचार प्रक्रियेमध्ये डावलले जात असल्याचे या मतदार संघातून बोलले जात आहे. मात्र पेण शहरामध्ये धारकर यांचे अनेक समर्थक असल्यामुळे शिसेवसेना उमेदवार प्रसाद भोईर यांच्या विधानसभा उमेदवारीच्या मतदानावर काहीसा फरक पडेल असे बोलले जात आहे.



