आज पेणमध्ये आदि”ती” महोत्सवाचे आयोजन !
सोहळा हळदी- कुंकवाचा स्त्रीच्या सौभाग्याचा आणि सन्मानाचा
प्रतिनिधि, पेण
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ‘जल्लोष नारि शक्तीचा’ हळदी- कुंकवाचा आणि तीळगुळ कार्यक्रम आज रविवार दिनांक १६ रोजी सायंकाळी ५ वाजता पेण नगरपरिषद मैदान येथे संपन्न होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने ‘जल्लोष नारी शक्तिचा’ या सांस्कृतिक आणि मनोरंजनाची मेजवानी असलेल्या आदि’ती’ महोत्सवाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती असते. उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाते. खेळ पैठणीचा, इतर सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात.
या वर्षी कार्यक्रमाचे खास आकर्षण ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्री सायली देवधर उपस्थित राहणार आहेत. तरी तालुका व शहरातील सर्व महिला भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पेण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पेणमधील समस्त नारी शक्तिला करण्यात आले आहे.

