कोकण कट्टा दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न !
प्रतिनिधि, मुंबई
कोकण कट्टा दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन कूपर रुग्णालयाच्या उपअधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार गुरुनाथ देसाई, स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त विनय कंटक, उद्योजक मनोज पाखाडे, कोकणकट्टा संस्थापक अजित पितळे, खजिनदार सुजित कदम, विवेक वैद्य, दया मांडवकर, विजय बाईत, दशरथ पांचाळ उपस्थित होते. अजित पितळे यांनी कोकणकट्टाच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिल्यानंतर डॉ. रेडकर यांनी कोकण कट्टाच्या सेवा कार्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.



