ताज्या बातम्याराजकीयसामाजिक

रोहा शहरातील विकास कामांचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण !

प्रतिनिधी, रोहा

आज श्री राम मारुती चौक, रोहा येथे बीपीसीएल च्या सीएसआर निधीअंतर्गत रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीतील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट लाइट्स व सोलार पथदिवे बसविण्याच्या कामाचे लोकार्पण रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ही उपक्रम मालिका शाश्वत ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षित सार्वजनिक सुविधा याचा संगम आहे. सौरऊर्जेचा वापर करून रोहा शहरात हरित ऊर्जेचा प्रसार करणे हे आपल्या सर्वांच्या जबाबदारीचं प्रतीक ठरते तसेच या सौरदिव्यांच्या माध्यमातून शहरातील रस्ते अधिक सुरक्षित होतील, वीजबिलात बचत होईल आणि पर्यावरणपूरकतेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जाईल असे खा. तटकरे यांनी सांगितले. तसेच रोहा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेला देखील खा. तटकरे यांनी भेट दिली.

याप्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, आनंद कुलकर्णी, मोतीलाल जैन, अरविंद करंबे, संतोष पोटफोडे, बंधू मोरे, महेंद्र गुजर, मकरंद बारटक्के व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह रोहा शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!