ताज्या बातम्या

विक्रम मिनीडोअरचा थांबवा हलविण्या तूर्तास स्थगिती !

अरविंद गुरव, पेण

पेण नगरपालिकेने २० मे रोजी विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेला अंतिम भुखंड क्रमांक १०० मधील विक्रम मिनीडोअरचा थांबवा हलविण्या संदर्भात २८ मे २०२५ आणि २९ मे २०२५ रोजी पोलीस बंदोबस्त येणार असल्याचे पत्र दिले होते. तसेच वाटाघाटीचे सुध्दा आमंत्रण दिले होते. यावेळी विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या वतीने पेण नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

त्यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल, विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील, नंदा म्हात्रे, विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील यांची मुख्याधिकारी जीवन पाटील याच्याशी सविस्तर चर्चा झाली या चर्चे अंती २८ मे व २९ मे ची कारवाई २ जून नंतर जर विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेने नगरपालिके बरोबर सकारात्मक चर्चा केली नाही तर पोलीस बळ लावून नगरपालिका रस्त्यासाठी हवी असणारी जागा खाली करुन घेईल याविषयी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले होते. 

त्यानुसार आज ३ जून रोजी मुख्यधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण नगरपरिषद कर्मचारी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन. जेसीबी आणि पोकलेन यंत्रसामुग्री घेऊन विक्रम स्टँडवर कारवाई करण्यासाठी गेले असता संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी  प्रशासनाने आमची भूमिका समजवून घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी केली. यावेळी विक्रम चालक मालक संघटनचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील, विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील आदी संघटनेचे पदाधिकारी यांनी आमदार रविशेठ पाटील याची निवासस्थानी भेट घेऊन हि कारवाई थांबिण्याची विनंती केली. यावेळी आमदार रविशेठ पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर विक्रम संघटनेचे पदाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांची बैठक झाली. यावेळी आंदोलन स्थळी खासदार धैर्यशिल पाटील यांनी भेट देऊन योग्य तो निर्णय झाल्याशिवाय प्रशासन व पोलिसांनी कारवाई करू नये असे आवाहन प्रशासनाला केले. 

यावेळी रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विक्रम चालक संघटनेने योग्य ती भूमिका घेऊन लवकरात लवकर प्रशासनाला त्यांचे म्हणणें कळवावे अशी चर्चा होऊन आजची कारवाई तूर्तास स्थगित केल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी जाहीर केले. 

खासदार धैर्याशिल पाटील यांनी विक्रम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्व लाईनच्या रिक्षा चालकांनी आपसात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा जेणेकरून प्रशासनाची वारंवार होणारी कारवाई टाळता येईल जागे संदर्भात पेण नगरपरिषद प्रशासन हद्दीत कुठे-कुठे गाड्या उभ्या करता येतील या संदर्भात चर्चा करावी यासाठी योग्य तो पाठपुरावा येथील आमदार रविशेठ पाटील, मी स्वतः खासदार या भूमिकेतून सर्वोतोपरी आपल्या पाठीशी राहीन परंतु लवकरात लवकर योग्य निर्णय होणे गरजेचे असून यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व चालक मालक यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच हा पूर्णविराम नसून स्वलपविराम असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

आज सकाळपासूनच पेण नगरपालिका प्रशासन व कर्मचारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात व यंत्र सामुग्रीसह विक्रम स्टँडवर तोडक कारवाई करण्यासाठी सज्ज झाले होते. परंतु आमदार रविशेठ पाटील व खासदार धैर्यशिल पाटील यांच्या मध्यस्थीमुळे आजची कारवाई तूर्तास स्थिगत करणे प्रशासनाला भाग पडल्यामुळे कारवाई साठी आणलेली यंत्रसामुग्री व पोलीस फौजफाटा याना  तब्ब्ल ५ तासांनी माघारी परतावे लागले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!