ठळक बातम्या

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा – राजेंद्र पवार, महावितरण संचालक

विठ्ठल ममताबादे, उरण

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक ३१ मे व १ जून २०२५ रोजी पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील २८ जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला रायगड जिल्ह्यातीलही अनेक पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या. “वीज कंपनीच्या उन्नतीमध्ये कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा असून, कंत्राटदारांकडून त्यांना होणाऱ्या अन्यायातून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून ठोस पावले उचलण्यात येतील,” असे आश्वासन त्यांनी दिले.बैठकीत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रभारी मा. सि. वि. राजेशजी यांचीही उपस्थिती होती.

या बैठकीतील प्रमुख मागण्या –

  • ई.एस.आय. (कर्मचारी राज्य विमा योजना) अंतर्गत वेतन मर्यादेत वाढ करून अधिक कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा.
  • वीज क्षेत्रातील कामगारांसाठी, हे काम धोकादायक उद्योग म्हणून घोषित करून स्वतंत्र वेतन अधिनियमांतर्गत विशेष सुरक्षा लाभ त्वरित लागू करावेत.

जर कामगारांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या ३० जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. – सचिन मेंगाळे, प्रदेश सरचिटणीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!