विभागीय आयुक्तांना गुरव पुजाऱ्यांकडून देवस्थान इनाम वर्ग ३ बाबत हरकती निवेदन सादर
प्रतिनिधी, पेण
इनाम वर्ग ३ संदर्भात गुरव समाज रायगड-ठाणे-मुंबई संस्थेच्या माध्यमातून गुरव समाजाच्या मंदिर पुजारी, वहिवाटदार, व्यवस्थापक, यांच्या हरकती व सूचना विभागीय आयुक्तांना आज संस्थेचे अध्यक्ष बंडू विरेश्वर खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली गुरव समाज बांधवांच्या उवस्थितीत सादर करण्यात आल्या.
यावेळी नवी मुंबई विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल (भा.प्र.से) त्याचबरोबर अप्पर आयुक्त महसूल कोकण विभाग वैशाली इंदानी उंटवाल यांना बेलापूर येथील कार्यालयात राज्य सरकारने केलेल्या आव्हानानुसार मंदिर पुजारी, व्यवस्थापक, वहिवाटदार, यांच्याकडून गुरव समाज रायगड-ठाणे-मुंबई संस्थेच्या वतीने हरकती आणि सूचना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आल्या. यावेळी दोन्ही विभागीय आयुक्तांनी संपूर्ण रायगड-ठाणे-मुंबई संस्थेच्या विशेष करून कोकण विभाग मधील सिंधुदुर्ग-रत्नागिरी- रायगड- ठाणे- मुंबई- पालघर-येथील मंदिरे त्याचबरोबर गुरव समाजातील इनाम वर्ग-३ संदर्भात सविस्तर माहिती त्याचबरोबर गुरव पुजारी यांचे मंदिरातील सेवा कार्य करीत असताना सरकार दरबारी अपेक्षित असलेले व्यक्तिगत म्हणणे व्यथा अडचणी विभागीय आयुक्तांनी सविस्तर जाणून घेतल्या.
यावेळी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारचा कायदा नव्याने बनविण्यासाठी मंदिर पुजारी बांधवांच्या वतीने सरकारला सकारात्मक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालय देणार असल्याचे आश्वासन उपस्थित गुरव समाज बांधवांना दिले.
यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष-विजय खंडेराव साळुंके, कार्यकारी प्रमुख- रमेश (काका) राजगुरव, संघटन सरचिटणीस विजय ठोसर, सचिन गुरव, खजिनदार- भगवान गणेशकर, सह खजिनदार- रवींद्र गुरव, पेण तालुका गुरव समाज युवक प्रमुख-अभिजीत गुरव, सोशल मीडिया प्रमुख-हरेश खंडागळे, स्थानिक समाज बांधव सदस्य- बाळासाहेब गुरव, सुशांत, गुरव, विजय बागुल, रंजीत गुरव, याप्रमाणे अनेक मंदिर पुजारी, व्यवस्थापक, वहिवाटदार आदी उपस्थित होते.

