शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीचा संवाद मेळावा चौल येथे संपन्न.
राजेश प्रधान, पेण
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीचा संवाद मेळावा गुरुवार दि.२६ रोजी शिवसेना जिल्हा कार्यालय चौल, तुलाडदेवी येथे उत्साहात संपन्न झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात महीला मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मेळाव्याला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निरीक्षक राजापूर तालुका संपर्क संघटक समिक्षा सक्रे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक नेहा माने, माजी उपसभापती पं.स.कुडाळ श्रेया परब, पुणे शहर संपर्क संघटक स्नेहल आंबेकर यानी मार्गदर्शन केले.
महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचा राजकीय व समाजिक सहभाग वाढविणे गरजेचे आहे. तसेच स्वतःच्या हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल अधिक जागरूक होण्यासाठी समाज माध्यम व तंत्रज्ञानाचा शिकाऊ वृत्तीने वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून महिला आपले प्रश्न व समस्या निर्भयपणे मांडू शकतील असे प्रतिपादन निरीक्षकांनी महिलांशी संवाद साधताना केले. यावेळी रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी महिला आघाडीला शिवसेना व अंगीकृत संघटनांचा पुर्ण पाठींबा असल्याचे सांगितले तसेच महीला आघाडीने महीलांचे प्रश्न व त्यांच्या वरील अन्यायाला वाचा फोडण्याकरीता पुढाकार घ्यावा प्रसंगी आंदोलन छेडावे सध्या राज्यात महीलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्य सरकार अक्षरशः फेल ठरलेले आहे. राज्यात सुरक्षित वातावरण व कायद्याची कठोर अंमलबजावणी साठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणे ही काळाची गरज आहे असे प्रतीपादन म्हात्रे यांनी यावेळी केले.
या मेळाव्याला विधानसभा प्रवक्ते धनंजय गुरव, महिला जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, जिल्हा संपर्क संघटिका शिल्पा घरत, उपजिल्हा संघटिका दर्शना पाटील, विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर, अलिबाग तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, तालुका संघटिका लीना घरत, मुरुड तालुका संघटिका राजश्री मिसाळ व शिवसेना महिला पदाधिकारी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

