सामाजिक

सायंकाळी पनवेल-पेण एसटीच्या अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवाशांना मनस्ताप – बंडू खंडागळे

एसटी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय ओळखून त्वरित पाऊले उचलावित.

प्रतिनिधि, पेण

सर्वसामान्य जनतेतल्या मनातील आणि सर्व सामान्य प्रवाशांच्या खिशाला परवाड़नार लाल परी असलेली आपली एसटी बस संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी आपल्या लाल परी एसटी बसचा वापर प्रवासी करीत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून पनवेल, नवी मुंबई, आणि मुंबईमध्ये जाणारे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी, व्यवसायिक व्यवसायासाठी रोज दैनंदिनी मुंबईत नवी मुंबईकडे मार्गक्रमण करतात. ही प्रवासी संख्या पाहता खऱ्या अर्थाने ठराविक वेळेमध्ये सकाळी आणि सायंकाळी एसटीची प्रवासी वाहतूक व्यवस्था अलिबाग – पेणकडून पनवेल, आणि पनवेल कडून पेण – अलिबाग त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील काही गावांकडे येण्यासाठी अपुरी पडत आहे. संपूर्ण जनतेला आणि नागरिकांना रोज सायंकाळी सहा नंतर रात्री नऊ वाजेपर्यंत अनेक वेळा गर्दीला सामोरे जावे लागते. यामध्ये अनेक महिला, मुली, विद्यार्थी, यांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. रोज दैनंदिन एसटीचे दिलेल्या अधिकृत वेळेनुसार मार्गक्रमण होत नसल्याने एसटीचे वेळापत्रक कोलमडते. डेपोतून गेलेली एसटी वेळेत न गेल्याने येणारी एसटी डेपो मध्ये वेळेत येत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना अनियमित वेळापत्रकामुळे आपल्या नियोजित ठिकाणी वेळेवरती पोहोचता येत नाही. अनेक लोकांसाठी हा रोजचा कार्यक्रम असल्याने त्यांना या सगळ्या गोष्टीची सवय झाली आहे. परंतु याला एसटी प्रशासनाने त्याचबरोबर राजकीय स्थानिक नेतृत्वाने सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.

त्यातच शासनाने महिलांसाठी दिलेले ५० टक्के सवलतीमुळे अर्धे तिकीट यामुळे एसटीने प्रवास करीत असताना पुरुषांपेक्षा महिलांची संख्या आज मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळत आहे. एसटीने ठरविले तर गेली अनेक वर्ष तोट्यात असलेली एसटी व्यवस्थित एसटी प्रशासन लालपरी ही जनतेच्या सेवेसाठी आहे. या हेतूने चालवली तर आज एसटी सारखी प्रवासी वाहतूक अत्यंत नफ्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. अनेक वेळेला जनतेतून प्रवास करीत असताना कर्मचारी वर्गाकडून विशेष करून कोकणात जाणाऱ्या एसटीच्या वाहक आणि चालक यांच्याकडून प्रवाशांना पेण, अलिबाग अन्य रायगड जिल्ह्यातील ठिकाणे येत असताना उद्धटपणे भाष्य करून वादाला सामोरे जावे लागते. एसटी कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामध्ये प्रेमाचा संवाद झाला पाहिजे. काही अपवादात्मक कर्मचारी वर्गाकडून प्रवासी यांना हा त्रास होत आहे. शेवटी प्रवासी जनतेच्या जीवावर एसटी परिवहन बस सेवा चालणार आहे आणि चालते. प्रवासी जनता ही जनता जनार्दन आहे. सायंकाळी पनवेल येथून साडेनऊ वाजता सुटणारी एसटी ही पेण गावात येणारी लोकल एसटी त्यानंतर रात्री उशिरा ११:४५ ला असल्याने प्रवासी जनतेला मध्यंतरीच्या कालावधीत रात्र असल्याने फार त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरिता मध्यंतरीच्या काळात दोन नव्याने एसटी पणकडे जाणाऱ्या सुरू करण्यासाठी लवकरच स्थानिक आमदार यांच्या माध्यमातून एसटी प्रशासनाकडे विनंती करण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई आणि बेलापूर येथून यापूर्वी कर्जत, खोपोली, मोहपाडा, रसायनी, आपटा, येथे NMMT नवी मुंबई महानगरपालिकेची प्रवासी बस व्यवस्था सुरू आहे. याप्रमाणे पेणसाठी सुद्धा ही बस व्यवस्था सुरू करण्यासाठी त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे पेण-पनवेल आणि पनवेल-पेण विना वाहक एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी स्थानिक खासदार आणि आमदार महोदय यांच्या माध्यमातून लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंडू खंडागळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!