महानगरपालिकेच्या आशीर्वादाने पदचारी रस्त्यात थाटले अनधिकृत कार्यालय !
के/पूर्व विभाग अंधेरी महानगरपालिका प्रशासनाच्या कारवाईकडे स्थानिकांचे लक्ष.

प्रतिनिधि, मुंबई
विलेपार्ले पूर्व, हनुमान नगर येथील सर्विस रोड लगत असलेले पुरातन श्री हनुमान मंदिर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ३० जानेवारी २०१९ रोजी अनधिकृत ठरवून रास्ता रुंदीकरणाचे कारण देऊन तोडण्यात आले. यावेळी येथील स्थानिकांनी नागरिकांनी विरोधही केला मात्र तरीही महानगरपालिकेने ते मंदिर तोडले. या मंदिराचा मालमत्ता कर मंदिराचे विश्वस्थ वेळच्या वेळी भरत होते. तसेच महानगरपालिकेने या मंदिराच्या मालमत्ता कर भरलेल्याची पावती ही दिली आहे मग हे मंदिर अनधिकृत कसे ? असा सवाल येथील स्थानिक विचारत आहेत.
महानगरपालिकेच्या आशीर्वादाने मंदिराच्या जागेपासून काही अंतरावर रोडच्या जागेवर २५ x १० फुटांचे व्यावसायीक कार्यालय थाटले गेले आहे. हे कार्यालय पोलो इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे असून येथील रस्त्याचे रुंदीकरण न करता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिराची जागा व रोड एका प्रायव्हेट कंपनीला वापरासाठी दिली असल्याने रस्त्याचे रुंदीकरणही रखडले आहे. येथे असलेल्या मिलन सबवेच्या पुलावरुन येणाऱ्या भरधाव वाहनांमधून वाट काढत येथील पदचारि, महिला, वृद्ध नागरिक यांना जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या कार्याल्यामुळे या भागात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींकडे महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का ? असा प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे.

प्राचीन श्री हनुमान मंदिर ज्याचा दर वर्षी मालमत्ता कर भराला जात होता. आणि महानगरपालिकेकडून कराची पावती ही दिली जात होती. तसेच सात/बारा उताऱ्यावर आणि नकाशावर श्री हनुमान मंदिर असा स्पष्ठ उल्लेख असूनही महानगरपालिका प्रशासनाने श्री हनुमान मंदिराला अनधिकृत ठरवून ते जमीनदोस्त केल्याने आणि समस्त भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. आता या ठिकाणी थाटलेले पोलो इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कार्यालय अधिकृत कसे ? हा सवाल जानतेकडून महानगरपालिकेला केला जात आहे. हे कार्यालय कोणाच्या आशीर्वादाने येथे थाटले गेले आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे. महानगरपालिका प्रशासन आणि त्यांच्या भोंगळ कारभारा विरोधात येणाऱ्या काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार येथील स्थानिकांनी केला असल्याचे संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि व्यवस्थापक – श्री जय हनुमान एस. आर. ए. को. ऑप. हा. सोसायटी (नियोजित) यांनी सांगितले.



