ताज्या बातम्या

आयपीएस आचल दलाल रायगड जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधीक्षक.

रायगड जिल्ह्यासाठी आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक नियुक्तीसाठीच्या हरीश बेकावडे यांच्या मागणीला यश.

अरविंद गुरव, पेण 

रायगड जिल्ह्यासाठी नवीन आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक नियुक्त करा याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी सातत्याने लावून धरली होती. त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्र देऊन अधिवेशन काळात व त्यानंतर सातत्याने मागणी करून प्रसारमाध्यमांनी त्यास प्रसिद्धी दिली होती. याची दखल घेऊन रायगड जिल्ह्यासाठी नवीन आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली त्याबद्दल रायगडमधील जनतेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी आभार व्यक्त केले.

रायगड जिल्ह्यातील वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी बेकायदेशीर चालणाऱ्या अवैद्य धंद्यांना चाप बसावा त्याचबरोबर मटका, जुगार, डान्स बार, ड्रग्स माफिया, बेकायदेशीर भंगार माफिया, रेव पार्टी, बलात्कार घटना, अपघात, खून, दरोडे, कायदा सुव्यवस्था बिघडणे, व्यसनाधीनता, वाळू माफिया, माती माफिया, त्याचबरोबर तळागाळामध्ये याच्यातूनच गुंडगिरी निर्माण झालेली होती. याची दक्षता घेऊन नवीन आयपीएस दर्जाचे रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक असावे व रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये अशा प्रकारचे कृत्य वारंवार घडू नयेत यासाठी नवीन पोलीस अधीक्षकांची तात्काळ नियुक्त करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याची दखल महाराष्ट्र राज्य शासनाने घेऊन नवीन पोलीस अधीक्षक नियुक्त केलेले आहेत.

आंचल दलाल या रायगडच्या नव्या पोलीस अधीक्षक असणार आहेत. पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्या रायगड पोलीस दलाची नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. त्या २०१८ सालच्या भारतील पोलीस सेवेतील अधिकारी आहे. त्यांनी यापुर्वी सातारा जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

आचल दलाल त्यांच्या नियुक्तीने पोलीस खात्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध घटनांचा अभ्यास करून यापुढे अतिशय चांगल्या प्रकारे बदल घडून येईल यात शंका नाही. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्याचं काम व अवैध व्यवसायांना चाप बसेल असे असे मत सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!