सामाजिक

स्थानिक माणसाला उभे करण्यासाठी उच्च शिक्षीत युवकांनी पुढे येवून काम करण्याची गरज – मा. आ. भाई जयंत पाटील.

माजी खासदार बॅ. ए. टी. पाटील याच्या १०१ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले मार्गदर्शन

अरविंद गुरव, पेण

मुंबईचा विचार केला तर आगरी कोळी मराठी माणुस हा येथील मुळ रहिवासी माञ बदलत्या काळच्या प्रवाहात हा मुळ माणुस मुंबई मधून हद्दपार झाला आहे. या धर्तीवर आज नवी मुंबई आणि तिसरी मुंबई येवू घातलेली आहे. त्या नव्या बदलात आज येथील जमीनी विकत घेतल्या जात असून येथील स्थानिक आगरी कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या आगरी कोळीमराठी माणसाच्या अस्तित्वासाठीव्यापक दुरदृष्टी असलेल्या तरुण उच्च शिक्षित तरुणांनी पुढे येवून समाजात काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भाई जयंत पाटील यानी केले.

माजी खासदार बॅ.ए.टी.पाटील याच्या १०१ व्या जयंती निमीत्त अतुल नंदकुमार म्हाञे प्रतिष्ठाण यांच्या वतीने पेण येथील आगरी समाज हाल येथे बॅ. ए. टी पाटील जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, डॉ.सिद्धार्थ पाटील, शेकापचे माजी नगरसेवक अजित साळुंके, प्रकाश शिगरूत, पेण प.स.चे माजी सभापती महादेव दिवेकर, चंद्रकात पाटील, काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे, सुर्यकात पाटील, ऍड.रोशन पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाई जयंत पाटील म्हणाले की गेली ४० वर्षे राज्याच्या विधीमंडळात गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाच्या भल्यासाठी आपण कायदे करीत आहोत. आज काळाच्या ओघात हा वर्ग संकटात सापडला आहे. या वर्गाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा माणसांना स्वाभिमानाने उभे करण्यासाठी बॅ. ए.टी. पाटील यांनी अव्याहत पणे काम केले ते काम पुढे नेण्यासाठी समाजातील तरूणांनी उच्च शिक्षित वर्गाने पुढे येवून काम करण्याची गरज आहे. अतुल म्हाञे सारखा व्यापक दुरदृष्टी असलेला तरूण आज हे काम करत आहे ही सामाधानाची बाब आहे. नवी दृष्टी असलेले असे तरूणच या समाजाला नवी दिशा देवू शकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सुर्यकात पाटील यांनी बॅ.ए.टी पाटील यांच्या अनेक पेलूंवर प्रकाश टाकला. तर डॉ. सिद्धार्थ पाटील यांनी आपल्या वडिलांच्या विचाराची थोरवी विषद करतांना अनेक आठवणी सांगितल्या कार्यक्रमाच्या शेवटी अतुल म्हाञे यांनी बॅ. ए. टी. पाटील याचे समाजासाठीचे कार्य किती मोठे आहे हे सांगून आज ते पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले. आज येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाची कायमची सोडवणूक करून येथील शेतकरी संपन्न कसा होईल यासाठी सर्वानी एकत्रीत येवून काम करणे आवश्यक असल्याचे सागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!