रायगड जिल्ह्यात ईद-ए- मिलादची सोमवारची सुट्टी कायम !

जिमाका, रायगड
रायगड जिल्ह्यात मुस्लिम बांधव व पोलिस अधिक्षक रायगड यांचेशी झालेल्या चर्चेनुसार ईद-ए-मिलाद निमित्ताने सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवण्यात आली आहे.
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए- मिलाद या सणाची सोमवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रायगड जिल्हयामध्ये नवीन अधिसूचनेव्दारे कायम ठेवण्यात आली आहे. याची सर्व शासकीय निमशासकीय कर्यालयानी आणि संबंधितानी नोंद घ्यावी असे उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांनी कळविले आहे.
