कर्जतच्या जागेवरून महायुतीत जुंपली !
राष्ट्रवादी-शिवसेना आमने सामने !

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, रायगड
विधानसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रात वाहु लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधनीला सुरवात झाली आहे. युती आणि आघाडीमधील पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात टाकण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून २५ उमेदवारांची यादी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. त्या यादिमध्ये रायगड जिल्ह्याच्या वाट्याला एक जागा जाहिर झाली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेंच सुरू असल्याचं दिसतंय. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. कर्जतच्या जगेवरून राष्ट्रवादी शिवसेना आमने सामने आल्याचं दिसतंय. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्युत्तर दिल्याचंसमोर आलंय.
सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते २८८ ही जागा मागतील, असा टोला आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना लगावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघावर दावा केला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद निर्माण झालाय.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद !
सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ते २८८ ही जागा मागतील, अशी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी केलीय. महायुतीचा निर्णय महायुतीतील नेते घेतील, तटकरे साहेब २८८ सिटवर लढतील, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. महायुतीचा निर्णय महायुतीचे नेते घेतील, अशी प्रतिक्रया शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आहे. परंतु कर्जतच्या जागेवरून महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय.
जागावाटपावरून महायुतीत मिठाचा खडा ?
कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दावा केल्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये वातावरण तापल्याचं दिसत आहे. अजून महायुतीने आगा्मी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची यादी जाहीर केलेली नाही. सध्या कर्जतचे विद्यमान आमदार शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आहेत, त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी ही जागा नेमक्या कोणत्या पक्षाला सोडतात ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जागावाटपावरून महायुतीत मिठाचा खडा पडणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.



