पेण-खोपोली रोड वरील रास्ता खचला ; रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा !

अरविंद गुरव, पेण
पेण नगरपालिका हद्दितील पेण-खोपोली रोडवर यूनिक बाजार या इमारतीच्या समोरील नाल्यावरील रास्ता गेले महिन्याभरापासून खचुन तेथे मोठा खड्डा पडला आहे. या खड्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असून, या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा खड्डा नगरपरिषदेने तातडीने भरावा अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून होत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन या खड्याकड़े दुर्लक्ष करीत आहे.

