ताज्या बातम्या

स्वातंत्र्य दिनी पेण नगरपरिषद अग्निशमन दलाचे जवान अभिजित गुरव आणि सहकाऱ्यांचा सन्मान !

महिला आणि बालकल्यान मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान

पेण नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान अभिजीत गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अलिबाग येथे १५ ऑगस्ट दिनी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पेण येथे महानगर गॅसची पाईप लाईन फुटून आगीच्या ज्वाला बाहेर येत होत्या भर वस्तीमध्ये ही घटना घडली होती त्यावर नगरपरिषद अग्निशमन दलाने तातडीने नियंत्रण मिळविल्याने संभाव्य धोका टळला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी पेण बाजार पेठेतील एका इस्त्रीच्या दुकानाला लागलेली आग मोठ्या प्रयत्नांनंतर विझवली कोणतीही जीवितहानी न होता आपत्कालीन परिस्थिती हातळत पेण नगरपरिषदेच्या जवानांनी अभिजित गुरव यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पेण तालुक्यात घडलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना कोणताही त्रास न होऊ देता परिस्थिती पेण नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे जवान हाताळत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल यांना आज सन्माणीत करण्यात आले. यावेळी अभिजित गुरव यांच्या सोबत विशाल बामणे, प्रसन्न पाटील, विजय चव्हाण, सूरज भोईर आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!