मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा नंतरच टोल घ्या : टोल वसुली विरोधात पत्रकारांचे आंदोलन !
रायगड प्रेस क्लबच्या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा पाठिंबा.
पेण दि. २१ – अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर सुरू करण्यात आलेली टोलवसुली तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच महामार्गाचे काम पूर्ण होऊन अधिकृत उद्घाटन होईपर्यंत टोलवसुली थांबवावी, अशी ठाम मागणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने शेकडो पत्रकारंच्या व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत खारपाडा टोल नाकयावर करण्यात आली.
पेण तालुक्यातील खारपाडा टोल नाक्यावर रायगड प्रेस क्लबचे हे आंदोलन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तसेच रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनील भोळे, जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, भारत रंजणकर, उपाध्यक्ष संजय मोहिते, मोहन जाधव, संजय मोहिते, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, पंनवेल प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे, यासंह सर्वच तालुक्यातील पत्रकार, व सामाजिक कार्यकर्ते, संतोष ठाकूर, हरीश बेकावडे, विजय पाटील, चैतन्य पाटील नंदू जांभुळकर, नंदा म्हात्रे समीर म्हात्रे,अशोक मोकल, आदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खारपाडा येथील टोल नाक्यावर शेकडोंच्या संख्येने आंदोलन करते धडकले यावेळी आंदोलनकर्त्या पत्रकारांनी टोल माफी झालीच पाहिजे पूर्ण महामार्ग त्वरित पूर्ण करावा सर्विस रोड त्वरित बांधावे अशा मागण्यांचे फलक व घोषणा देऊन टोल माफी सुरू केली यावेळी टोल नाक्यावर पनवेल व पेन तालुक्यातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गेल्या आठवड्यात सुरू केलेला खारपाडा टोल नाका त्वरित बंद करावा अशी मागणी करित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल कार्यालयातील अधिकारी इंगवले यांना रायगड प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.तत्पूर्वी अनेकानी आपली मते मांडली. सरचिटणीस पत्रकार शशिकांत मोरे यांनी टोल बाबत शेरोशायरी व पोवाडा वाचन केले. तर महामार्गवरील अनेक सर्विस रोड गटारांची कामे तसेच टोल माफी बाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर पाठवला जाईल अशा प्रकारचे आश्वासन आंदोलन करताना महामार्ग विभागाचे अधिकारी इंगवले यांनी यावेळी दिले.
” महामार्गाचे अपूर्ण असणारे काम,, दोन टोल चे अंतर, तसेच टोलची होणारी वसुली याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आम्ही पत्रकारांचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असून कोणत्याही परिस्थितीत महामार्ग पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली सुरू करू नये व सर्वांना टोल माफी मिळावीव टोल वसुली न थांबल्यास जून महिन्यात यापेक्षा अनेक पटीने मोठे आंदोलन करू असे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी येथे आपली भूमिका मांडली.


