गुरव समाज रायगड-ठाणे-मुंबई संस्थेची कडाव येथे पुजारी संवाद बैठक संपन्न !

प्रतिनिधी – कर्जत
राज्य सरकारच्या इनाम वर्ग ३ जमिनी संदर्भात राज्यभरातील गुरव (पूजारी) यांच्यामेध्ये जनजागृती व्हावी, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज वैजनाथ, गौर कामत, कडाव, कर्जत, मुद्रे, भालेवडी, तमनाथ, येथील मंदिर पुजारी, व्यवस्थापक, वहिवाटदार, यांची गुरव समाज ठाणे – रायगड – मुंबई संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारचा इनाम वर्ग ३ जमिनी संदर्भात येणारा नवीन कायदा या संदर्भात संवाद बैठक पार पडली. या बैठकीच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी इनाम वर्ग ३ जमिनी संदर्भात राज्य सरकारचा नवीन येणारा कायदा या बाबतीमध्ये उपस्थित मंदिर पुजारी व्यवस्थापक, वहिवाटदार यांना मार्गदर्शन आणि माहिती दिली.
या बैठकीसाठी गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे अध्यक्ष: बंडू विरेश्वर खंडागळे, कार्याध्यक्ष-विजय साळुंके, कार्यकारी प्रमुख- रमेश (काका) राजगुरव, संघटन सरचिटणीस- सचिन गुरव, विशाल गुरव, उपाध्यक्ष- रामचंद्र गुरव, सहखजिनदार- रवींद्र गुरव, देविदास गुरव, सदस्य- प्रवीण गुरव, स्थानिक समाज बांधव प्रशांत गुरव, दत्ता पालकर, संतोष गुरव, वसंत पालकर, शंकर गायकवाड, संतोष गुरव, त्याचबरोबर अन्य समाज बांधव या बैठकीसाठी गुरव-पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


