सामाजिक

शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न !

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व ईरा फॉर विमेन संस्थेचा उपक्रम.

संजय कदम, पनवेल

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. निसर्गाचे पर्यावरण संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांसोबत विध्यार्थी वर्गाचीही आहे. पनवेल शहर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित राहील त्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल द्वारे विठोबा खंडापा विद्यालय येथे ईरा फॉर विमेन या संस्थेच्या सहकार्याने शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली यामध्ये सुमारे १२० विद्यार्थी सहभागी झाले होते.

या प्रसंगी शाळा समितीचे चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दिपक गडगे, प्रोजेक्ट चेअरमन माजी अध्यक्षा सौ. प्रियाताई पाटील, माजी विद्यार्थी / नगरसेवक गणेश कडू यांचे सह अनेक रोटरी सदस्य व एन्स उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. गावित मॅडम, कला शिक्षक श्री. नेरुरकर तसेच मार्गदर्शन करण्यासाठी ईरा फॉर विमेन संस्थेच्या प्रमुख रुपाली पाटोळे व त्यांची टीम कार्यरत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!