एज्युकेशन

“ओळख देशभक्तांची, शाळा तिथे क्रांतिमंदिर” हा उपक्रम

सी.एफ.आय.व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचा पुढाकार

पेणमधील सहा शाळांचा समावेश

पेण (विनायक पाटील)
चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने पेण तालुक्यातील एकूण सहा शाळांमध्ये “ओळख देशभक्तांची, शाळा तिथे क्रांतिमंदिर” हा उपक्रम राबवण्यात आला. याचा लाभ एकूण ३००० विद्यार्थ्यांनी घेतला. या उपक्रमांतर्गत २००० क्रांतिकारकांची चित्रे व माहिती याचे प्रदर्शन करण्यात आले होते. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे चे देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने यांनी हे प्रदर्शन मुलांसाठी उपलब्ध करून दिले होते. तसेच मुलांना माहिती वाचून जे क्रांतिकारक ओळखता आले नाहीत त्यांची माहिती करून दिली व त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. तसेच त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्या संदर्भात विपुल चित्रे व ग्रंथ डिजिटल पीडीएफ स्वरुपात सर्व शाळांना भेट देण्यात आला व त्यांना असे सांगण्यात आले कि रोज जेव्हा शाळेची प्रार्थना होते तेव्हा मुलांनी त्यातील आवडीचा एक क्रांतीकारक घेऊन त्यांची माहिती इतर मुलांना वाचून दाखवावी जेणेकरून मुलांना क्रांतीकारकांविषयी माहिती मिळेल व अधिक जाणून घेण्याची आवड त्यांच्यात निर्माण होईल. मुलांनीही उपक्रमानंतर अभिप्राय देताना सांगितले की, यामधील काही क्रांतिकारकांविषयी माहिती नव्हती ती नव्याने माहिती मिळाली. तसेच शाळेतील शिक्षकांनीही आपला अभिप्राय देताना नमुद केले कि असे उपक्रम मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत व त्यांच्या ज्ञानात भर टाकणारे आहेत. तसेच असे उपक्रम अजूनही राबवण्यात यावे.

उपक्रमाच्या शेवटी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांनी पेणमधील शाळांशी संपर्क साधून शाळा व त्यांचा वेळ उपलब्ध करून दिला, त्यामुळे हा उपक्रम राबवता आला व जास्तीत जास्त मुलांपर्यंत क्रांतिकारकांची माहिती पोहचवता आली म्हणून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे चे देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने यांनी डॉ. किशोर देशमुख यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!