क्राईम

लपून बसलेल्या बांगलादेशी नागरिकांना पेण पोलिसांकडून अटक !

प्रतिनिधी, पेण

पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तरणखोप गावचे हद्दीत बांगलादेशी नागरिक असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याबाबत कायदेशीर कारवाई करणेबाबत पेण पोलीस निरीक्षक यांचेकडून सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार पेण पोलीस स्टेशन पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता सदर ठिकाणी दोन बांगलादेशी नागरिक आपले वास्तव्य लपवून अनधिकृतपणे वास्तव्य करत असताना आढळून आले. त्यांचेकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री पटल्याने त्याबाबत पेण पोलीस ठाणे येथे बांगलादेशी इसम १) जसिमोद्दीन अबुल कासिम काझी, वय ४९ वर्ष, २) लिली खातून खुरशीद अली, वय ४३ दोघे राहणार – मोहन सखाराम पाटील यांची चाळ, अमृत बेकरी जवळ, तरणखोप ता.पेण जि. रायगड, मूळ गाव बगुरा,पो.अभयपूर, जिल्हा झेणाईदा, बांगलादेश यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १०१/२०२५ परकीय नागरिक अधिनियम १९४६ चे कलम १४ सह परकीय नागरिक आदेश १९४८ नियम ३(१) सह पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९६० चा नियम ३, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अभिजीत शिवथरे, अप्पर पोलीस अधीक्षक, रायगड, गजानन टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी पेण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बागुल, पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे व निलेश राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांच्या सूचनेनुसार पेण पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे आणि त्यांच्या टीम ने केली आहे. सदर घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!