उद्योगपती राजू पिचीका यांच्या हस्ते रिक्षा स्थानकाच्या काँक्रीटीकरणाचे उद्घाटन

प्रतिनिधि, पेण
पेण बस स्थानका जवळील असणाऱ्या तीन चाकी रिक्षा स्थानकाच्या काँक्रिटिकरणाचे उद्घाटन आज रामेश्र्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पीचीका आणि पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. गेली अनेक वर्षे या रिक्षा स्थानकाच्या जागेची दुरवस्था झाली होती आणि हे रिक्षा स्थानक खड्ड्यात गेल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे रिक्षा चालकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र पेण बस स्थानकाचे काँक्रीटीकरणाचे काम रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सूरू असताना रिक्षा चालकांनी आमच्या रिक्षा स्टँड मध्ये देखील काँक्रीटीकरण करून देण्याची मागणी केल्यानंतर राजू पीचिका यांनी त्वरित त्यांची मागणी मान्य करून मोफत काँक्रीटीकरण करून दिले आहे. त्या काँक्रीटीकरणाचे उद्घाटन आज राजू पीचिका आणि पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या हस्ते कऱण्यात आले. यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे संघटक अजय पाटील,अध्यक्ष संतोष पाटील,उपाध्यक्ष योगेश म्हात्रे, कार्याध्यक्ष मोरेश्वर पाटील, खजिनदार शिवदास पाटील, सेक्रेटरी अनिल ठाकुर, सह सेक्रेटरी विलास कांबळे सल्लागार महेश पोरे, पांडुरंग पाटील, सुनिल साळुंखे यांसह सर्व रिक्षा चालक आणि मालक उपस्थित होते. यावेळी उपस्थित रिक्षा चालकांनी राजू पीचिका यांनी तत्परता दाखऊन स्वतःच्या खर्चाने काँक्रीटीकरण करून दिल्याबद्दल आभार मानले.



