सामाजिक

अंधेरी दैवज्ञ समाजाचा ८ वर्धापन दिन साजरा !

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, मुंबई

अंधेरी दैवज्ञ समाजाचा ८ वा वर्धापन दिन रविवारी दिनांक ४ में रोजी सायंकाळी ५ वाजता रंगमंचाची पुजा करुन व श्रीफळ वाढवून डॉ. प्रविण पोतदार यांच्या हस्ते साजरा झाला. डॉ. प्रविण पोतदार, डॉ. प्रशांत दांडेकर, जिवन कांदळगावकर, अध्यक्ष अशोक माहुलकर, महिला विभाग अध्यक्षा नीता कासेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

सरचिटणीस अनिल कारेकर यांनी संस्थेचा मागील सर्व अहवाल सादर केला व आमचा १० वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संस्थेचा मानस आहे अशी ईच्छा व्यक्त केली. हा वर्धापनदिन संस्थेने नामदार नाना शंकरशेट यांच्या कार्याला समर्पित केला होता. त्यानिमित्ताने नानांच्या कार्याचे माहितीपूर्ण फलक प्रदर्शित केले होते. यावेळी मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर करून नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस असे नामकरण करण्यासाठी प्रतिकात्मक मोर्चाचे सादरीकरण करून ज्ञाती बांधवांमध्ये जनजागृती चा प्रयत्न केला.

डॉ. गजानन रत्नपारखी यांनी डॉ. प्रशांत दांडेकर आणि डॉ. प्रविण पोतदार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रशांत दांडेकर यांनी आपल्या भाषणामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि बघा आपलं काम कसं होते, असे सुंदर मार्गदर्शन केले.

अंधेरी दैवज्ञ समाजाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे कौतुकास्पद मत डॉ. पोतदार यांनी व्यक्त केले.
दै.स.प. चे विश्वस्त व अंधेरी दैवज्ञ समाजाचे सल्लागार रविंद्र माहिमकर (रविमा) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रविमा आपल्या भाषणात म्हणाले की अंधेरी दैवज्ञ समाजाच्या स्थापने पासून मी सर्व कार्यक्रमात सहभागी होतो. कार्यकर्ते उत्साहाने काम करताना पाहून मन भारावून जाते.
यावेळी मराठी राज्य भाषा निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलि होती त्याचा निकाल उपाध्यक्ष ज्योती पोवळे यांनी जाहीर केला विजेत्यांचे अभिनंदन केले व सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार मानले. द्वितीय पारितोषिक विजेत्या संध्या चाचड यांनी आपल्या निबंधाचे वाचन केले आणि आपण मंत्रालयात काम करत असताना नाना शंकरशेट यांचे स्मारक आणि नाना शंकरशेट टर्मिनस नामांतर या साठी जे सहकार्य करता येईल ते करेन असा विश्वास दाखवला.
गोरेगावकर ज्वेलर्सचे पंकज गोरेगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

डॉ. गजानन रत्नपारखी आपल्या भाषणात म्हणाले की, अंधेरी दैवज्ञ समाजाचे पदाधिकारी पदासाठी नाही तर समाज कार्यासाठी नेहमी तत्पर असतात. आपल्या दिलखुलास भाषणाने सर्व उपस्थितीताची मनें जिंकली.
अध्यक्षीय भाषणात अशोक माहुलकर यांनी सांगितले की कोणत्याही कार्यक्रमात आधी गणरायाला वंदन करून सुरुवात करतो तसेच आम्ही कार्यक्रमाच्या आधी गजानन रत्नपारखी यांच्या भेटीने घेऊन करतं असतो.
डॉक्टर संस्थेच्या सुरवातीपासून आमच्या बरोबर आहेत व पुढेही राहतील. महीला विभाग सेक्रेटरी आरती मसुरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यानंतर स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!