कुर्डुस विभागात शेकापचा सुपडा साफ !
नवखार ग्रामस्थ, मुंबईकरांसह भाजप कार्यकर्त्यांचाही शिवसेनेमध्ये जाहिर पक्ष प्रवेश

किरण बांधणकर, पेण
कुर्डुस विभाग हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. आता शेकापची हे वर्चस्व संपत आले आसून नवखार गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी आलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. पुष्पगुच्छ आणि शिवसेनेची भगवी शाळ देऊन स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशाने कुर्डुस विभागात शेकापची शेकापचा सुपडा साफ झाला असून आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत येथील मतदार शिवसेनेला एकहाती विजयी करुन आपला विकास साधण्यास सज्ज झाल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी केले आहे.

नवखार गावात अनेक समस्या आहेत, शेकापच्या माध्यमातून त्या सोडवल्या जातील अशी अपेक्षा येथील मतदारांची संपत आल्याने अखेर त्यांनी मोठ्या आशाने आ. महेंद्र दळवी, शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी, तुषार शेरमकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने नवखार गावामध्ये विकासाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी प्रवेश करणाऱ्या मतदारांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना राजाभाई केणी यांनी नवखार ग्रामस्थ व मुंबई नवतरुण मंडळ नवखार यांचे आभार मानले. शेकाप असो वा भाजपा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पिळवणूकच केली गेली. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपले निर्णय सामान्य कार्यकर्त्यांवर लादले, याचाच उद्रेक होत आहे. युतीच्या पक्षधर्मात कोणी ढवळाढवळ केली तर खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही यावेळी राजाभाई केणी यांनी अलिबाग- मुरुड मतदार संघातील भाजपाच्या नेत्यांना दिला आहे. यावेळी सानेगावचे माजी सरपंच मोहन पाटील, कुर्डुस ग्रामपंचायतीचे भाजपाचे सदस्य सोन्या उर्फ प्रथमेश पाटील, शेकापचे सदस्या समिता सुतार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. नवखार ग्रामस्थांना सतावणाऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्याचेही वचन यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. महेंद्र दळवी यांनी सांगितले की, मागील १४ वर्ष कोर्ट कचेऱ्या करुनही नवखार स्मशानभूमीचा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सुटलेला नाही. या प्रकरणात शिवसेनेचाही एक स्थानिक कार्यकर्ता लोकहीत न पाहता स्वतःच्या फायद्यासाठी हस्तक्षेप करीत होता, त्याला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. लोकांच्या हितासाठी अशी कारवाई करण्यातही शिवसेनेचे नेतृत्व मागेपुढे पहात नाही, स्मशान भूमीच्या जागेचा प्रश्न हा कायदेशीर प्रक्रियेतील आहे. या जागेवर ताबा-कब्जा ग्रामस्थांचा असल्याने नवखार ग्रामस्थांचा हमखास विजय होणार असा विश्वासही आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. नवखार ग्रामस्थ मंडळ आणि गावच्या विकासाकडे नेहमी बारकाईने लक्ष ठेवून असणाऱ्या मुंबईकर मंडळाने कुर्डुस परिसरातील शिवसेनेचे नेते तुषार शेरमकर यांच्या माध्यमातून आ. महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्याशी संपर्क साधला. हा पक्ष प्रवेश कुर्डुस परिसरातील आगामी राजकारणाला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास तुषार शेरमकर यांनी व्यक्त केला.
यावेळी मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष नामदेव म्हात्रे, मंडळाचे सल्लागार संतोष ठाकूर, मंडळाचे पदाधिकारी सुरेश बैकर, सुनील ठाकूर, उमेश पाटील, जालींदर पाटील, योगेश ठाकूर, निलेश ठाकूर,अमोल ठाकूर, प्रमोद पाटील, अंकूश ठाकूर या प्रमुख कार्यकर्त्यांसह नवखार ग्रामस्थ प्रविण ठाकूर, अनंत ठाकुर, दिलीप ठाकूर, अभिमन्यू ठाकूर, हिराजी ठाकूर, प्रमोद पाटील, धनाजी पाटील, मोहन पाटील, सदानंद ठाकूर, हरीभाऊ ठाकूर, नरेश ठाकूर, मच्छिंद्र पाटील, महिला कार्यकर्त्या शकुंतला ठाकूर, ललिता पाटील, मयुरी ठाकूर, रंजिता ठाकूर, गीता पाटील, प्रेमा पाटील, नुतन पाटील, ललिता पाटील आदी महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
