क्रीडा

पेण तालुक्यात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न !

प्रतिनिधि, पेण

२३ ऑगस्ट रोजी पेण तालुका स्तरीय (सन- २०२४-२५) शालेय कुस्ती या क्रीडा स्पर्धेची सुरुवात ‘क्रीडा संकुल पेण’ या ठिकाणी करण्यात आली. युवा नेते तथा समाजसेवक रुपेशदादा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात झाली.

पेण तालुका कुस्ती स्पर्धा आयोजक श्री. अरुण डोंगर, दिवेकर सर, अक्षर विद्यालय हमरापुर क्रीडा शिक्षक यांनी या स्पर्धा उत्तम रीतीने पार पाडल्या. तसेच या स्पर्धेमध्ये उपस्थित प्रायव्हेट हायस्कूल पेण क्रीडा शिक्षक श्री एस. एम. वलवी, सुयोग मोकल, जी.के .म्हात्रे वाशी हायस्कूल क्रीडा शिक्षक तसेच उपस्थित होते. कुस्ती स्पर्धक विद्यार्थी क्रीडा संकुल चे कामगार रघुनाथ म्हात्रे (काका) उपस्थित होते. तसेच पेण तालुका क्रीडा स्पर्धा समन्वयक श्री. निलेश पाटील सर, शारदा विद्यामंदिर कासू सहशिक्षक या सर्वांनी उपस्थिती दर्शवली व स्पर्धा यशस्वी पणे पार पाडण्यात आणल्या. सदर स्पर्धा पेण तालुका क्रिडा संकुल येथे संपन झाली. या मध्ये पेण तालुक्यातील प्रायव्हेट हायस्कूल, सरोजिनी स्कूल, के एस एस स्कूल, अक्षर विद्या मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल या शाळांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!