क्राईम

अपघात घडवून पळ काढण्याचा प्रयत्न !

मद्यधुंद समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकाचा प्रताप

सुरेश इंगळे, नाशिक

राज्यभरात गेल्या काही दिवसापासून हिट अँड रन्सच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच नाशिकमध्ये हिट अँड रन्स चा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे .एका मध्य धुंद समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकाने दोन चारचाकी आणि दुचाकीला उडवून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली असून नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधीक्षक विजय चव्हाण (५६) हे त्यांची कार दारूच्या नशेत चालवत होते. पौर्णिमा बस स्टॅन्ड परिसरातील गणपती हॉटेल जवळ उभा असलेल्या गाड्यांवर त्यांनी धडक दिली. या तीन गाड्यांचे नुकसान झाले. त्यामुळे विजय चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!