ताज्या बातम्या

शासकीय आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचा बळी !

आमच्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता तिच्या चेहऱ्यावर असलेले डाग हे जन्मापासूनच होते. कुष्ठरोगाचे नव्हते. चुकीचे निदान करून आमच्या मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे. आमच्या मुलीच्या लिव्हर मध्ये आलेली सूज तसेच अंगावरती सूज हे लक्षण चुकीचे उपचारा मुळे आली होती. माझ्या मुलीच्या मृत्यूस आश्रमशाळा मुख्याध्यपक आणि अधीक्षिका जबाबदार आहेत त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी. – नामदेव ठाकरे (दुर्दैवी मुलीचे वडील)

आमच्या शाळॆत कुष्ठरोग निर्मलन बाबत शिबीर झाले आणि त्यात एका मुलाला कुष्ठरोगी ठरवले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेल्या गोळ्या आमच्या अधीक्षिका यांच्याकडून दररोज तीला देण्यात येत होत्या. तसेच त्या मुलीला ताप आल्यावर आम्ही वाकरूळ येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य उप केंद्रात नेले होते. – अजित पवार, (मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे)

प्राथमिक आरोग्य केंद्राने खुशबू हिला गोळ्या देण्यास सांगितले त्याप्रमाणे मी दररोज दोन गोळ्या झोपण्याआधी देत होते. नंतर तिला ताप आल्यानंतर दोन गोळ्या देण्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितल्यावर एक गोळी देण्यास सुरुवात केली.तिचे पालक शाळॆत आले आणि घरी घेऊन गेले त्यावेळी त्यांना दररोज हि गोळी एक द्यायची आहे असे सांगितले. – सुवर्णा वरगने, अधीक्षक शासकीय आश्रमशाळा वरवणे

शासनाच्या निर्देश नुसार आम्ही आश्रम शाळेत कॅम्प आयोजित केला होता.तेथे एक विद्यार्थिनीला कुष्ठरोग असल्याचे आढळून आले. त्या दिवशी आमच्याकडे गोळ्यांची पाकिटे नव्हती आणि त्यामुळे लगेच गोळ्या सुरू केल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सदर मुलीचे नावाचे लेबल केल्यावर १८ डिसेंबर पासून उपचार सुरू केले. – डॉ. नेत्रा पाटील (वैद्यकीय अधिकारी, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!