ताज्या बातम्या

पेण – हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले

पेण – पेण तालुक्यात गेले ४ दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले आणि जलाशये दुथड़ी भरुन वाहत आहेत. पेण येथील हेटवने धरण पूर्ण भरल्याने या धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. हेटवने धरणाच्या ६ दरवाजांमधून ३.३५ घमी/से एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत ८३ टक्के वाढ झाली असून धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी पत्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!