ताज्या बातम्या

सह्याद्री प्रतिष्ठानचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !

प्रतिनिधी, पेण

दर वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री प्रतिष्ठानने ओम साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकाऱ्याने पेण येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिरामध्ये पेण तालुक्यातील तरुण वर्ग तसेच महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

राज्यातील गड संवर्धन आणि इतर सामाजिक कार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी दरवर्षी आम्ही धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने महिन्यातील पहिल्या रविवारी हा शिबिर पार पडत असतो. मात्र यावेळी देशात युद्धाचे सावट असल्याने या रविवारी हे शिबिर घेण्यात आले आहे. यावेळी हा शिबिर घेण्याचा मूळ उद्देश म्हणजे जे सीमेवर युद्ध सुरू आहे त्या जवानांना वेळ पडल्यास रक्ताची कमतरता भासू नये या साठी आम्ही हे शिबिर आयोजित केले असून सोशल मीडियाद्वारे येथील संस्था, मंडळे यांना आवाहन केल्यानंतर शेकडो रक्तदाते आज जमले आहेत. गतवर्षी झालेल्या शिबिरात ३९१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता यावर्षी पाचशे हून अधिक रक्तदाते या शिबिरात सहभागी होतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पेण तालुक्यातील विराज म्हात्रे आणि श्वेता म्हात्रे यांनी आपल्या लग्नाच्या अकराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकत्रितपणे रक्तदान करून एक आगळावेगळा संदेश दिला.

सदर शिबिराला ओम साई ब्लड बँक पनवेलचे डॉ.  बनकर, सचिन पाटील, प्रतिमा गवते, निकिता चोरट, ऋतुजा पाटील, किशोर बडगुजर आदी डॉक्टर उपस्थित होते तर हे शिबिर संपन्न करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष साईराज कदम, प्रशासक अच्युत पाटील, रोशन टेमघरे, केतन म्हात्रे, रोहित केणी यांसह सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो मावळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!