सुमारे ५ किलो गांजा जप्त !
वडखळ पोलिसांकडून गांजा जप्त करून कारवाई
प्रतिनिधी, पेण
वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ जून रोजी पोलीस अधिकारी व पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना एस बी आय बँके समोर दोन इसम घाबरलेल्या अवस्थेत लगबगीने हातात बॅग घेऊन गल्लीतून जाताना दिसल्याने पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्यांची झाडाझडती घेतली असतात त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४६ हजार रुपये किंमतीचा ४ किलो ९२० ग्रॅम गांजा मिळून आला. सुशांत गौरंग साहू, वय ४२ वर्ष आणि गौरंग पुरुषोत्तम साहू वय ६३ वर्ष अशी या आरोपींची नावे असून त्यांना वडखळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

