मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न !
माजी सभापती स्व. मोरेश्वर भगत यांच्या २९ व्या पूण्यस्मरण सोहळ्या निमित्त आयोजन.

अरविंद गुरव, पेण
दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही पंचायत समितीचे दिवंगत सभापती मोरेश्वर भगत यांच्या २९ व्यां पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त कै. मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा, पेन यांच्या तर्फे डॉ. हळदीपुरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबले ट्रस्ट, पनवेल यांच्यामार्फत स्व. मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय खारपाडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा लाभ पेण तालुक्यातील सुमारे १०८ नागरिकांनी घेतला. या शिबिराचे तपासणीअंती १५ रुग्णांना मोतिबिंदु असल्याचे निष्पन्न झाले. मोतिबिंदु असणाऱ्या रुग्णांवर लक्ष्मी चॅरिटेबले ट्रस्ट, पनवेल यांच्या तर्फे मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दयानंद भगत यांनी दिली.

कै. मोरेश्वर भगत पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ नेते समाजसेवक कृष्णा नागोजी ठाकूर व संस्थेच्या सदस्या निर्मला ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी पेण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे, जिते पंचायत समिती गणाचे अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे, पेण तालुका राष्ट्रवादी युवती उपाध्यक्ष आणि बळवली ग्रामपंचायत सदस्या रिया ठाकूर, ह भ प नारायण पाटी, ह भ प गणपत पाटील, जिते माजी उपसरपंच ज्योती म्हात्रे, जिते शाखाध्यक्ष तानाजी म्हात्रे, माजी उपसरपंच हासुराम ठाकूर, उद्योगपती मधुकर भगत, ग्रामपंचायतीच्या सदस्य अनिता भगत, माजी उपसरपंच महादेव भगत, माजी सरपंच धनाजी भगत आदि मान्यवत उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दयानंद भगत, संस्थेचे उपाध्यक्ष रमेश घरत सेक्रेटरी कैलास रुठे आदींनी मेहनत घेतली.

