शिवसेनेच्या वतीने रावे शाळेत सॅनिटरी नॅपकीन मशीनचे उद्घाटन !
शाळा प्रशासनाने मानले आभार
प्रतिनिधि, पेण
८० टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्त्वानुसार काम करत असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज पेण तालुक्यातील रावे येथील सार्वजानिक माध्यमिक विद्या मंदीर या शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीनचे उद्घाटन शिवसेना विधानसभा सह समन्वयक समीर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्त विभागीय पोलिस अधिकारी बी. आर. पाटील,युवा सेना उप तालुका अधिकारी अमित टावरी, रावे शाखाप्रमुख बळी पाटील, खारसापोली हामारापुर विभाग उप तालुका अधिकारी संतोष म्हात्रे, चंदन महाराज, गणेश पाटील, मितेश पाटील, राजा पाटील, सहिल घरत, विशाल पाटील, विश्वनाथ खामकर, मयुर चाळके, केतन पाटील, सूर्यकांत तांबोळी, निशिकांत पाटील यांसह शाळेतील प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
सध्या स्त्री ला समाजात अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र सॅनिटरी नॅपकीन सारखी आवश्यक गोष्ट विशेष करून वयात आलेल्या मुलीला शाळेमध्ये उपलब्ध व्हावी ही महत्त्वाची गरज लक्षात घेऊन अमित टावरी यांनी विनंती केल्यानंतर समीर म्हात्रे यांनी तातडीने ही सॅनिटरी नॅपकीन मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले.
यावेळी बोलताना समीर म्हात्रे यांनी बोलताना मुलींची वयामध्ये येतानाची प्राथमिक गरज लक्षात घेऊन मी ही मशीन देण्याचा निर्णय घेतला असुन आजची ही मुलगी उद्याची दुर्गामाता आहे. हे वय शिकण्याचे असुन शिकून चांगले नाव कमवा, आपली संस्कृती जपा आणि पालकांनी सुद्धा मुलीला मासिक पाळी बाबत पटऊन देऊन तिला आधार देण्याचा प्रयत्न करा असे सांगितले. तर निवृत्त विभागीय पोलिस अधिकारी बी. आर. पाटील यांनी अशा प्रकारची गरजेची वस्तू दिल्याबद्दल समीर म्हात्रे यांचे आभार मानून असे सामजिक कार्य करणारे खूप कमी आहेत. मात्र असेही काही सामजिक कार्यकर्ते आहेत की जिथे खरी गरज आहे तिथे ते मदतीचा हात पुढे करत नाहीत, तर जिथे आपला जास्त दिखावा होईल, आपलाच गवगवा होईल अशा ठिकाणी बरेच जण मदत करण्यात धन्यता मानतात ही वृत्ती कुठेतरी थांबायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

