ताज्या बातम्या

महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात पेण भाजप आक्रमक!

भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे आणि चेतन पाचपांडे यांचे त्वरित निलंबिन करण्याची केली मागणी.

प्रतिनिधी, पेण

पेण तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. सर्वसामान्य नागरिक तसेच लहान मोठ्या व्यवसायांबरोबरच येथील गणपती कारखान्यांना ही याचा चांगलाच फटका बसला आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये महावितरणचा भोंगळ कारभाराविरोधात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ घेऊन आज पेण भाजप आक्रमक झाला असून भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्निल म्हाञे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना भोंगळ कारभाराबाबत जाब विचारत भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे आणि चेतन पाचपांडे यांना त्वरित निलंबन करण्याचे निवेदन अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांच्याकडे देण्यात आले आहे.

तसेच सुधारित वितरण क्षेत्र योजना आर डी एस एस सारख्या योजनांमध्ये भ्रष्टकारभार करणारे अभियंते यांचे त्वरित निलंबन झाले नाही तर खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निलंबनाबाबत तक्रार करणार असल्याचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांनी सांगितले.

महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत वारंवार तालुक्यातील वीज पुरवठा खंडित होत आहे तसेच राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे परंतु अभियंत्यांकडून योजनेत भ्रष्टाचार करून योजना केवळ कागदावरच राबवल्याजात असल्याने वेळेवर तालुक्यात दुरुस्तीची कामे केली जात नाहीत, जुन्या लाईनी बदलल्या जात नाहीत, पोल बदलले नाहीत, डिपी बदलले नाही यामुळे वीजपुरवठ्याच्या समस्या होत आहेत तरी ही नागरिकांना भरमसाठ वीज बिल देण्यात येत आहेत 

या इतर समस्ये बाबतची पोलखोल पेण भाजपने करून अधीक्षक अभियंता यांना निलंबना बाबाबत मागणी केली आहे. यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे,तालुकाध्यक्ष संजय डंगर, डी.बी.पाटील,हरिओम म्हात्रे,परशुराम पाटील,मुरलीधर भोईर,अमित पाटील, विवेक म्हात्रे,गणेश पाटील,प्रशांत पाटील,चंद्रकांत पाटील आदी भाजप पदाधकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!