ताज्या बातम्यासामाजिक

पेण प्रेस क्लबकडून प्रगतशील शेतकरी सन्मानित.

अनिल काणेकर आणि चंद्रकांत म्हात्रे या शेतकऱ्यांचा केला सन्मान !

प्रतिनिधी, पेण

शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबुन न राहता शेती सोबत फळझाड लागवड, कुक्ककूट पालन, मत्स्यशेती, यासारखे उत्पन्न्न. देणारे जोडधंदे केल्यास उत्पन्न अधिक पटीने वाढू शकते असे व्यक्तव्य पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी शेतकऱ्यांचा गौरव करताना वक्तव्य केले. रायगड प्रेस क्लब अंतर्गत पेण प्रेस क्लब तर्फे तालुक्यातील दोन प्रगतशील शेतकरी अनिल चंद्रकांत काणेकर, रा. सापोली व चंद्रकांत म्हात्रे रा भाल ता. पेण या शेतकऱ्यांचा सपत्नीक शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, देऊन तालुका नायब तहसीलदार प्रसाद कालेकर,, कृषी अधिकारी सागर वाडकर, व जिल्हा प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत गोपाळे,यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष विजय मोकल, लहुशेठ पाटील, एस एच गायकवाड आदी मान्यवर मांचावर उपस्थित होते.

पेण प्रेस क्लब आयोजित शेतकऱ्यांचा सत्कार. शेताच्या बांधावर हा उपक्रम आहे आणि आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार करतो. शेतीसह इतर फळपिके, मत्स्य शेती करणाऱ्यांची माहिती घेऊनच निवड करतो. शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल, असे सांगतानाच,
शेतकऱ्यांचा गौरव करणारी जिल्ह्यासह राज्यातील एकमेव संस्था असल्याचे रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी येथे संगितले. तर सामाजिक बांधिलकी ठेऊन पत्रकार काम करत आहेत. शेतकऱ्यांचा सन्मान करत आहेत ही चांगली बाब आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. केंद्र व राज्य शासनतर्फे उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना पुरस्कार आणत आहेत. असे तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले.

सत्कारानंतर अनिल काणेकर, आणि चंद्रकांत म्हात्रे यांनी आपले शेतीतील अनुभव, व अपेक्षा व्यक्त केल्या. कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक कमलेश ठाकूर यांनी तर आभार विजय मोकल यांनी मानले. यावेळी प्रदीप मोकल, प्रकाश माळी संतोष पाटील आदी पत्रकारांनी कार्यक्रम स्थळी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!