पॉलिटेक्निक महाविद्यालय येथे चाणक्य कौशल्य विकास केंद्र !
खा. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते उदघाटन
प्रतिनिधि, पेण
पेण येथील पॉलिटेक्निक महाविद्यालय मध्ये शक्रवार दिनांक २० रोजी चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थित राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राद्वारे युवकांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.
यावेळी प्रांतधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार शेजाळ, नगरसेवक शोमर पेणकर, नगरसेवक सुनीता जोशी, महाविद्यालय प्राचार्य, कर्मचारी वर्ग व विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धा येथील कौशल्य, रोजगार, उधोजकता व नावीन्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र राज्यात १००० मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे ऑनलाईन उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे.



