सामाजिक

आमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली संपन्न !

अमलीजन्य पदार्थाच्या सेवनामुळे शरीरा बरोबरच कुटुंबाचीही हाणी – पोलीस निरीक्षक संदीप बागुल

प्रतिनिधी, पेण

पेण पोलीस ठाण्यातर्फे २६ जून रोजी अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित साधून रायगडाच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सुचणे प्रमाणे शहरातून जनजागृतीपर विद्यार्थ्यांची रॅली काढून विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून अमली जन्य पदार्थाच्या सेवनामुळे आपल्या शरीराची तर हाणी होतेच पण संपूर्ण कुटुंबाची देखील हाणी होत असल्याने अमली पदार्था पासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तर पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेतली.

यावेळी पेण पोलीस ठाणे येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सार्वजनिक कॅालेज, प्रायव्हेट हायस्कुल, कन्या शाळा, भाऊसाहेब नेने विद्यालय आदी शाळांमधून १०३ विद्यार्थी तसेच पेण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संदीप बागुल, स.पो.नि निलेश राजपुत, विक्रम नवरखेडे, संतोष चव्हाण, शिल्पा वेगुर्लेकर आदी अधिकारी व १५ अंमलदार, शिक्षक,शांतता कमीटी सदस्य, पत्रकार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!