ताज्या बातम्या

मुक्या जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या दोघांना टेम्पोसह पनवेल शहर पोलीस घेतले ताब्यात !

संजय कदम, पनवेल

मुक्या जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या दोघांना टेम्पोसह पनवेल शहर पोलीस ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

आरोपी मोहम्मद युसुफ अब्दुलाहा कुरेशी ( वय ३७) आणि मोहम्मद आरीफ मोबीन अन्सारी (वय ३८) (दोघेही राहणार मानखुर्द शिवाजी नगर) हे दोघेजण पनवेल जवळील पळस्पे गावच्या हद्दीमधील चर्च जवळून ओलेरो पिकअप एमएच ०४ एल क्यू ०९०५ सफेद रंगाच्या टेम्पो मध्ये गोवंश जातीच्या दोन तांबडया रंगाच्या गाई व दोन काळया रंगाचे बैल त्यांना अखुड दोरीने घट्ट बांधुन कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची खबर मिळताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धामापूरकर, पोलीस हवालदार पवार, गुन्हे शाखा आदींच्या पथकाने सदर टेम्पो मुक्या जनावरांसह ताब्यात घेऊन आरोपी विरोधात महाराष्ट्र्र पशु संरक्षण अधिनियमन १९७६ कलम ५, ५बी, ५ए, ९ तसेच प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ कलम ४७ व इतर कलमांद्वारे त्यांच्यासार कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!