ताज्या बातम्या

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अघोरी पूजा मंत्रतंत्राचा वापर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा आरोप

रायगडावर नवसाचा अघोरी कृत्य करण्यात आल्याचा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांचा दावा

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, रायगड

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता, त्या व्हिडीओसोबत गोगावले यांनी अघोरी पूजा केली असा दावा मोरोंनी केला होता. त्यानंतर आता भरत गोगावलेंचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. या आधी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही तसाच एक व्हिडीओ शेअर केला होता. एकनाथ शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडीओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी घरी अघोरी पूजा करुन घेतली असा दावा यावेळी सूरज चव्हाण यांनी केला. भरत गोगावलेंचा व्हिडीओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरतशेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का? असा सवाल उपस्थित केला होता, त्यानंतर आता त्यांनी या व्हिडीओबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणी बोलताना सूरज चव्हाण म्हणाले, काल मला सूत्रांच्या आधारे एक व्हिडिओ मिळाला. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून बाबा बुवा यांच्याकडून पुजा करून घेत आहे. वसंत मोरे यांनीही एक व्हिडिओ दाखवला होता. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये. एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालायला हवे. पालकमंत्रीपदासाठी अशा प्रकारच्या पुजेचा घाट घालणं चुकीचा आहे. भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडून याची दखल घ्यायला हवी त्यांनी दखल न घेतल्यास आम्ही निर्णय घेऊ असंही पुढे सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आजू बाजूला मंदीर नाही पुजेदरम्यान कुठलाही फोटो, नाही मग कसली पुजा होती. हा प्रश्न महायुतीचा भाग म्हणून नाही तर एक जागरूक नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने माझाशी संपर्क साधला होता, ही पूजा पालकमंत्री पदासाठी एक महिन्यापूर्वी झालेली आहे. यावेळी कुठला बळी दिला गेलाय का? एकनाथ शिंदे प्रमुख आहेत ते निर्णय घेतील, असंही पुढे सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. सुनील तटकरेंवर शिवसेना नेत्यांकडून टिका होतं आहे. आमचीही पालकमंत्रीपदाबाबत अपेक्षा आहे. मात्र मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. कशासाठी ही पूजा केली त्यांनाच माहीती. मात्र, आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ती पुजा पालकमंत्रीपदासाठीच केलेली आहे.

संभाजी ब्रिगेडचा तो आरोप काय?

रायगडावर नवसाचा अघोरी कृत्य करण्यात आल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे. निवडून येण्यासाठी रायगडच्या भरत गोगावले यांनी नुसती अघोरी पूजाच घातली नव्हती तर त्यांनी मंत्रीपद मिळण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ‘नवस’ सुद्धा बोलला आणि तो फेडला, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगे़डने केला आहे.

महाराष्ट्रात रायगडाचे पावित्र्य राखले जात नसेल त्या सरकार आणि मंत्र्यांकडून काय अपेक्षा करायची, दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने गोगावले यांच्यावर अघोरी पूजा बांधल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता गोगावले काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!