हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटी तर्फे शिक्षकांचा सन्मान

राजेश प्रधान, पेण
शिक्षक दिनाचे औचित्य साधून हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटी तर्फे शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटी तर्फे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन जितेंद्र जयवंत पाटील मुख्याध्यापक, श्री चंडिकाई देवी विद्या मंदिर आरव व जानवी जितेंद्र पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सोसायटीचे संस्थापक हिराजी पाटील, अध्यक्षा शशिकला पाटील, उपाध्यक्ष लिलानाथ पाटील, खजिनदार रमेश तांडेल, प्रमुख पाहुणे मनिष भोसले आदींसह संस्थेचे कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरगरीब व ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने या संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे संस्थापक हिराजी पाटील यांनी सांगितले. श्रीधर्माशेठ नारायण पाटील माध्यमिक विद्यालय शिर्केचाळ, माध्यमिक विद्यामंदिर कोप्रोली, माध्यमिक विद्यामंदिर खारपाडा, आनंद माध्यमिक विद्यामंदिर कणे व श्री चंडिकाकाईदेवी माध्यमिक विद्यालय आराव संस्थेच्या अशा पाच शाळा या शाळांचा लाभ ग्रामीण भागातील सुमारे ६०० विद्यार्थी घेत आहेत. विनाअनुदान तत्वावर मागील अनेक वर्ष या शाळा संस्थेने चालविले आहेत सद्यस्थितीत २० टक्के अनुदान मिळत असून ८० टक्के खर्च संस्थेतर्फे सोसला जात आहे. तरी देखील दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावा याकरिता संस्था कार्यरत असून संस्थेचा विस्तारही नजीकच्या काळात होणार आहे अशी माहिती संस्थापक हिराजी पाटील यांनी याप्रसंगी दिली.


