क्राईम

पेण येथे तरुणीची छेडछाड ; आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, पेण

पेण येथील अमुल आईस्क्रीम पार्लर दुकानात आईस्क्रीम घेण्याकरिता गेलेल्या तरुणी सोबत आरोपी सुबोध जोशी वय ६२ या ज्येष्ठ नागरिकाने छेडछाड केल्याची घटना घडल्याने पेण शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पेण शहरातील चावडीनाका येथे असलेल्या अमुल आईस्क्रीम पार्लरच्या दुकानात चावडी नाका जवळच राहणारी फिर्यादी तरुणी आईस्क्रीम घेण्यासाठी गेली असता आरोपी सुबोध जोशी (वय ६२) रा. लोकमान्य सोसायटी यांनी तीला दुकानाचे टेरेस दाखविण्याचा बहाणा करून फिर्यादी या जिना चढत असताना त्यांचे हात जबरदस्तीने सुबोध जोशी यांनी आपल्या कमरेस पकडुन ठेवून तसेच जीना उतरत असताना फिर्यादी स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे हातवारे करत छेडछाड केल्याने घाबरलेल्या पीड़ित तरुणीने तेथून पळ काढत पेण पोलिस स्टेशन गाठले पिडीत महिलेची हकीकत ऐकून पेण पोलीसठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या बाबत महिला दक्षता कमिटी पेण यांनी कोणती पाउले उचलली अथवा पिडीत महिलेला काय मदत केली याबाबत प्रसारमाध्यमांनी चौकशी केली असता महिला दक्षता कमिटीने बघ्याची भुमीका घेतली असे निदर्शनास आले. सदर प्रकरणाबाबत पेण तालुक्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलीस निरिक्षक संदीत बागुल यांची भेट घेउन सदरील गुन्हयाच्या तपासा बाबत विचारणा केली. तसेच महिला दक्षता कमिटी अकार्यक्षम असल्याचे ताशेरे देखील ओढले. पोलीस निरिक्षक संदीप बागुल यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, सदरील आरोपी विरूध्द भारतीय न्याय सहिता कलम ७४/८० नुसार गुन्हा दाखल केला असून या गुह्याचा अधिक तपास पोलीस निरिक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!