घरगुती भांडणातून पतीने केली पत्नीची हत्या.
प्रतिनिधि, पेण
पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनविण्याच्या भांडणातून पतीने पत्नीचे भिंतीवर डोके आपटून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.24) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती नुसार पेण पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि. २४) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील शहापाडा धरणाचे परिसरात एकाच कुटुंबातील पती गोपीनाथ वाघमारे (वय ४०) आणि पत्नी पिंकी वाघमारे (वय ४५) यांच्यामध्ये जेवण बनविण्यावरून वाद झाला. आरोपी ने जेवण न बनविण्याचे कारणावरून पत्नीबरोबर भांडण करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय भिंतीवर आपटून जिवे ठार मारले. याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपीस २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.नि. संदीप बागुल हे करीत आहेत.

