जिते प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्यांचे वाटप करून अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा

पेण – राजेश प्रधान
ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवर उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी याकरिता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवस सप्ताह निमित्ताने गुरुवार दिनांक २५ रोजी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिते जिल्हा परिषद मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिते येथे सामाजिक बांधिलकी जपण्याचे निमित्ताने वैदकिय साहित्य भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद भगत, जिते प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, जिते जिल्हा परिषद अध्यक्ष सुदर्शन पाटील, जिते शाखा अध्यक्ष धनाजी म्हात्रे, जिते माजी उपसरपंच ज्योती म्हात्रे, प्रीतम म्हात्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
