पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर तपास कारवाईमध्ये सहा लाखाची रोकड जप्त.
संजय कदम, पनवेल
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर पासून आदर्श आचारर्संहिता लागू झाली आहे. पनवेल १८८ विधानसभा मतदार संघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचार संहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ६ (एसएसटी पथक ) ने आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे सकाळी १०:०० ते रात्री २२:०० वाजेपर्यंत वाहन तपासण्याचे कर्तव्य करत असताना सकाळी ११:५५ वाजण्याचे दरम्यान गोवा-पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या राखाडी रंगाच्या टाटा पंच चार चाकी गाडीस थांबवून तपासणी केली असता, त्या गाडीमध्ये ६ लाखाची रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त करण्यात आली.
सदर कारवाई १८८ पनवेल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक खर्च निरीक्षक विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक संजय आपटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कराड, आचार संहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संहिता सनियंत्रण अधिकारी शरद गीते, सहाय्यक आचार संहिता पथक प्रमुख जी. एस. बहिरम, सहाय्यक आचार संहिता पथक समन्वयक दिनेश भोसले, नितेश चिमणे, तुषार म्हात्रे तसेच पळस्पे फाटा चेक पोस्टवरील एसएसटी पथकाचे प्रमुख किरण पोकळे, कामोठे पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई जितेश नवघरे,तळोजा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई प्रकाश म्हस्के, खारघर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई हौसराव खकाळ उपस्थित होते.



