खासदार सुनिल तटकरे यांच्या दालनाचे उद्घाटन संपन्न !
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, मुंबई
रायगड जिल्ह्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय, मुंबई येथील दालनाचे उद्घाटन आज संपन्न झाले. यावेळी खा. तटकरे यांनी सांगितले की, हा क्षण केवळ एक औपचारिक नाही , तर पक्षाशी असलेल्या माझ्या निष्ठेचा आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
या दालनातून आगामी काळात पक्षाच्या कार्यासाठी नव्या योजनांची आखणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी एक प्रभावी माध्यम निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री ज्येष्ठ नेते नवाब मलिक‚ प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, शेखर निकम‚ प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव‚ मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे‚ प्रवक्ते संजय तटकरे‚ मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे‚ मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे‚ प्रदेश सरचिटणीस श्रीमती राजलक्ष्मी भोसले‚ प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


