ट्रक चालकाला मारहाण करून लुटला ३३ हजारांचा मुद्देमाल !

संजय कदम, पनवेल
पनवेल जवळील पळस्पे हायवे २०० मीटरच्या पुढे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या पुणे लेनच्या ९.८ कि.मी. अंतरावर एका ट्रक चालकाला जबरी मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल फोन असा मिळून जवळपास ३३ हजार रुपये किंमतीचा ऐवज ४ अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
गेंदलाल पटेल (३५ रा.मध्यप्रदेश) हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेवून पनवेलवरुन पुणे असा माल भरुन घेवून जात असताना सदर ठिकाणी त्यांनी ट्रक थांबवून ते लघुशंकेसाठी खाली उतरले ४ अज्ञात इसमांनी तेथे येवून त्यांना हाता बुक्क्यांनी व जमिनीवर फरफटत नेवून त्यांना जखमी करून त्यांच्या खिशातील व ट्रकच्या सीटमधील दोन मोबाईल फोन व २३ हजार रुपये रोख असा एकूण ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



