सामाजिक

समाजसेवक दत्ता कांबळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वातंत्रदिनी सन्मान

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, पेण
पेण येथील समाजसेवक दत्ता कांबळे उर्फ डि.के यांनी पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तर्फे स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यात आला. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन दत्ता कांबळे यांना अलिबाग येथे गौरविण्यात आले.
यावेळी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त जिल्हाधिकारी थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग प्रांताधिकारी मुकेश चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून नेहमीच कार्यरत असणारे दत्ता कांबळे यांनी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्ती मध्ये सचोटीने व तत्परतेने शोध मोहिमेस केलेली मदत, नैसर्गिक आघाताने बाधित झालेल्या नागरिकांना अन्नपण्याची केलेली मदत, हायवे महामार्ग रायगड पोलिसांना रिप्लेक्टेड जॅकेट वाटप करणे, हजारो नागरिकांचे अपघाती विमा पॉलिसी काढणे, कोरोना काळात निर्जंतीकरण कक्ष, नागरिकांसह पोलीस व पत्रकार यांना मास्क वाटणे, गोळ्यांचे वाटप करणे, महाड पूर परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, अंतोरे येथे हाय मास्ट ची उभारणी, नुकतेच पेण, वडखळ, दादर सागरी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस व अधिकाऱ्यांना तसेच पेण मधील सर्व पत्रकारांचा प्रत्येकी पाच लाखाचा विमा देखील दत्ता कांबळे यांनी स्वखर्चाने काढला. अशी एक नव्हे तर अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे दत्ता कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तर्फे स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यात आला. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन दत्ता कांबळे यांना अलिबाग येथे गौरविण्यात आले. दत्ता कांबळे यांना याआधीही बरेच पुरस्कार मिळाले आहेत.

Add Your Heading Text Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!