पत्रकार संजय कदम यांना ब्ल्यू पँथर्सचा ‘मौल्यवान रत्न’ पुरस्कार प्रदान !
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन आले गौरवण्यात
संजय कदम, पनवेल
पनवेल तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चलवळीत सक्रिय असणारे पत्रकार, संगीत, गायन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी ब्ल्यू पँथर्स या संघटनेने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना ब्ल्यू पँथर्सचा ‘मौल्यवान रत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या विशेष कार्यक्रमात गेल्या ३० वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात केलेल्या भरघोस कामगिरी बद्दल त्याच प्रमाणे तळागातील लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची बाजू वेळोवेळी वृत्तपत्रांमध्ये मांडून त्यांना न्याय देणारे संजय कदम हे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याने ‘ब्ल्यू पँथर्सचा ’मौल्यवान रत्न‘ पुरस्कार वपोनि नितीन ठाकरे यांच्या हस्ते पनवेल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील सोनावळे, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, विजय गायकवाड, सुनील सोनावणे, महेश साळुंखे, कमलाकर कांबळे, नितीन कांबळे, नवनीत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज सदावर्ते यांनी केले, तर कृष्णा गायकवाड यांनी आभार मानले.

