गोकुळाष्टमी निमित्त गडबला ‘पुतना राक्षस वध’ पथनाटय सादर.
गडब गावच्या गोपालकाल्यात चलचित्र हे मुख्य आकर्षण.
प्रतिनिधी, पेण
पेण तालुक्याती गडब गावात गोपाल काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येथील चालचित्र या गोपाल काल्याचे मुख्य आकर्षण असते. या चालचित्र साजरीकरण परंपरेला या वर्षी सुमारे ३० वर्षांचा इतिहास आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाल काल्याच्या दिवशी गडब येथील ग्रामस्थांनी या वर्षी दोन चित्ररथांचा समावेश गोविंदा मिरवणूकी मध्ये केला होता. हे चित्ररथ पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
यातील एक चित्ररथ हा कंसाचा होता तर दुसऱ्या चित्ररथामध्ये नंदाचा राजवाडा सजवून दाखविला होता. दोन्ही चित्ररथांच्या समोर टीपरी नृत्य लहान मुले गोपगीपीकांच्या वेशामध्ये करीत होती. हे दोन्ही चित्र रथ, गावांमध्ये फेरी मारून काळंबादेवी गडब मंदीरासमोर, सादर करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूला तरूण मुलांनी एका गणवेशात दोन फळ्या तयार करुन ढोल वाद्यायाच्या तालात वाजत गाजत लेझीम नृत्य ही सादर केले. तेथे पुतणा राक्षसीने श्रीकृष्ण बाळास छातीला विष लावून दूध पाजण्याचा प्रसंग दाखविण्यात आला. आणि याचवेळी बालरुपी श्रीकृष्णाने पुतना राक्षसीनीच्या छातीला चावा घेवून यमसदनी पाठविण्याचे दृश्य सादर केला. हे पाहून हजारो प्रेक्षक गोविंदा प्रेमिंनी टाळ्या वाजवून दाद दिली व कौतूक केले.
या पथनाट्यातील पात्र – कंस – नंदकुमार जनार्दन म्हात्रे, यशोदामाता संतोष म्हात्रे, राक्षस पूतना- नितंब म्हात्रे, स्वरुप पुतना -वैष्णवी चवरकर, शिवाई. मनीष चवरकर व राहुल पाटील, वेशभूषा-अलंकार पाटील, गीत गायन-स्वप्नील जांभूळकर, केसरीनाथ पाटील तर टीपरीनृत्य दिगदर्शन- सुरेश चवरकर व पथनाट्य लेखन व दिग्दर्शन. के. डी. चवरकर यांनी केले होते. तर कार्यक्रमास सहकार्य व आयोजन शिवछत्रपती ग्रुप यांनी केले.



