रायगड सम्राट व जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न!
राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्रतीक्षा घाडगे तर उरण तालुकास्तरीय प्रथम क्रमांक हिरामण खुटले ठरले मानकरी

संजय कदम, पनवेल
रायगड सम्राट प्रस्तुत व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था व आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. शेकाप मध्यवर्ती कार्यालय आयोजित या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी माजी सभापती काशिनाथ पाटील जि. प. सदस्य विलास फडके, माजी सरपंच अशोक म्हात्रे, माजी उपसभापती राजेश केणी जे. एम. म्हात्रे ट्रस्ट अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक कोरेगाव सातारा येथील प्रतीक्षा अमोल घाडगे तृतीय क्रमांक बोर्लेचे दिलीप दत्तू पाटील तृतीय क्रमांक कामोठे येथील दिपाली भरत माने, चतुर्थ क्रमांक नांदगाव येथील अशोक खुठले तर पाचवा क्रमांक दिनेश नाईक आसुडगाव यांना देण्यात आले. तर या स्पर्धेत सर्वात जास्त उरण पनवेल तालुकास्तरीय भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रथम क्रमांकाचे मानकरी तुरमाळे येथील हिरामण शांताराम खुठले, द्वितीय क्रमांक गोठवणे उरण येथील दीपक वसंत पाटील, तृतीय क्रमांक सावळे येथील दिलीप म्हसकर, चतुर्थ क्रमांक मोठी जुई येथील जयदास कोळी, पाचव्या क्रमांकाचे कुडावे येथील प्राची संतोष ठोंबरे यांना देण्यात आला. त्याच बरोबर प्रोत्साहनपर पारितोषिक श्रीधर पाटील, आसुडगाव हातनोली येथील एकनाथ मते, दापिवली येथील मयूर भोईर, रेवसचे दिनेश मनोरे, नारपोली रोशन म्हस्कर, पिरकोन विनिकेत रमेश गावंड बामण डोंगरी येथील विलास आंग्रे यांना देण्यात आले.
यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहू न शकलेल्या स्पर्धकांना बक्षिसे घरपोच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, पत्रकार निलेश सोनावणे, दत्ता मोकल, असीम शेख, समाजसेवक मंगेश अपराज आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यावेळी आमदार बाळाराम पाटील माजी नगरसेवक गणेश कडू यांनी रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले त्याच बरोबर जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला सलग तीन वर्षे उपक्रम राबवित असल्याने शुभेच्छा दिल्या.




